गर्दीयुक्त शहराखाली 200 वर्षे जुना रस्ता
प्राचीन दुकानांचे अस्तित्व
ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरात एक रहस्य दडलेले आहे. या गर्दीयुक्त शहराखाली एक प्राचीन रस्ता दफन आहे. या रस्त्याच्या कडेला दुकाने निर्मित असून गॅसने पेटणारे लॅम्प लावण्यात आलेले आहेत. ब्रिस्टल शहराच्या एका गर्दीयुक्त रस्त्याखाली एक पूर्ण व्हिक्टोरियन काळातील रस्ता दडलेला आहे. ज्याला आता अत्यंत धोकादायक मानून सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. हा रस्ता जमिनीखाली असून केवळ भुयारांद्वारेच तेथे पोहोचता येते. तर वरून हजारो लोक आणि वाहने जात असतात.
हे रहस्यमय ठिकाण लॉरेन्स हिल भागाखाली आहे. कित्येक वर्षांपासून येथील लोक विविध प्रकारच्या कहाण्या ऐकवित आले आहेत. एक इसम पबमधून परतत असताना एका ख•dयात कोसळला आणि अशा रस्त्यावर पोहोचला, जो अत्यंत प्राचीन होता अशी सर्वात प्रसिद्ध कहाणी आहे. तेथे जुन्या दुकानांचे फ्रंट, 19 व्या शतकातील गॅस लॅम्प आणि दगडांनी निर्मित रस्ता अद्याप अस्तित्वात असल्याचे सांगण्यात येते.
जमिनीखाली प्राचीन रोड
या कहाण्यांनी प्रभावित होत इतिहासकार डेव स्टीफेन्सन यांनी स्वत: सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. हातात कॅमेरा आणि टॉर्च घेत ते जमिनीखाली उतरले. त्यांच्या या शोधानंतर जी छायाचित्रे समोर आली, त्यांनी या कहाण्या केवळ अफवा नव्हत्या हे सिद्ध केले. डेव यांना तेथे अनेक तळघरं आणि छुपे कक्ष आढळुन आले, यात एका पबखाली निर्मित जुना डिस्को, मृतदेह ठेवण्याचे ठिकाण (कॉफिन स्टोअर), को-ऑप कंपनीच्या अश्वांसाठी जुना अस्तबल आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरण्यात आलेला एक अनौपचारिक बॉम्बशेल्टर देखील आहे.
200 वर्षे जुना इतिहास
एक भुयार तर थेट एका बँकेखाली जाते. जेव्हा कधी जमिनीखाली बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या भुयाराला विटांनी पूर्णपणे बंद करण्यात आला. चोरी रोखण्यासाठी अनेक भुयारे आणि दुकाने सील करण्यात आली आहेत असे डेव यांनी सांगितले. या भागातील काही हिस्से 200 वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. 1832 मध्ये येथे एक अश्वांच्या मदतीने चालविण्यात येणाऱ्या रेल्वेचा मार्गही होता आणि त्यावर लाकडी पूल तयार करण्यात आला होता, परंतु जेव्हा वाफेने धावणाऱ्या रेल्वेसाठी नवा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला तेव्हा रस्ता उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला, या प्रक्रियेत खालील जुना पब आणि आसपासची दुकाने जमिनीखाली दाबली गेली आणि वर नवा रस्ता तयार करण्यात आला, ज्याला मेहराबदार भुयारांचा आसरा देण्यात आला.