For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदाराच्या घरात 200 कोटींचे घबाड

06:40 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
खासदाराच्या घरात  200 कोटींचे घबाड
Advertisement

प्राप्तिकर’च्या धाडीनंतर दोन दिवसांपासून मोजदाद

Advertisement

वृत्तसंस्था / रांची

झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या झारखंड आणि ओडीशामधील घरांमध्ये टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल किमान 200 कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. हे धाडसत्र गुरुवारी प्राप्तिकर विभागाकडून सुरु करण्यात आले होते. ते दोन दिवस चालले. सापडलेली रोख रक्कम मोजण्यासाठी विभागाला दोन दिवसांचा कालावधी लागला.

Advertisement

अद्यापही सर्व रक्कम मोजून झालेली नाही. शिवाय आणखी रोख रक्कम सापडत असून अंतिमत: सर्व मिळून ही रक्कम 250 कोटी रुपयांच्याही पुढे जाऊ शकेल, असे अनुमान काढण्यात आले आहे. अनेक कपाटे, अलमाऱ्या आणि खोक्यांमधून ही रक्कम साठवून ठेवण्यात आलेली आहे, असे आढळले होते.

अधिकृत रक्कम अद्याप नाही

नेमकी किती रक्कम सापडली यासंबंधी प्राप्तीकर विभागाने अद्याप घोषणा केलेली नाही. तथापि, काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम 300 कोटी रुपयांच्या पुढेही जाऊ शकते. कारण, अद्यापही अनेक खोकी उघडायची आहेत. तसेच या खासदारांच्या अनेक घरांवर अद्याप धाडी घालण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अंतिम आकडा घोषित होण्यास वेळ लागेल, अशी माहिती देण्यात आली,

नोटा मोजण्याचे यंत्र बिघडले

प्राप्तिकर विभागाने नोटा मोजण्याचे यंत्र नोटांची गणना करण्यासाठी उपयोगात आणले होते. तथापि, ते यंत्रही अतिउपयोगामुळे बिघडले. 50 कोटी रुपयांच्या नोटा मोजल्यानंतर यंत्रात बिघाड झाला. परिणामी, नोटगणना लांबली. ओडीशाच्या बोलंगीर आणि संभलपूरमधील घरांवरही धाडी टाकण्यात आल्या होत्या. धीरज साहू हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते झारखंडमधील लोहारडागा येथील रहिवासी आहेत.

Advertisement
Tags :

.