For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sindhudurg crime news | बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास ; सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायालयाचा निकाल

04:36 PM Feb 23, 2026 IST | NEETA POTDAR
sindhudurg crime news    बालिकेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास   सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायालयाचा निकाल
Advertisement

                                            वेंगुर्ल्यात सातवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Advertisement

ओरोस : एका सातवर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली विष्णू प्रसाद डील्ली कृष्ण न्यौपाने (६१, रा. नेपाळ) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडही ठोठावण्यात आला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून सूरज पाटील, राजेंद्र दळवी, अनिता कोळी, नाथेबा हिप्परकर, चंद्रकांत चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.

वेंगुर्ले तालुक्यातील एका किनारपट्टी गावात आंबा बागेत काम करण्यासाठी आलेल्या कुटुंबांपैकी एक अल्पवयीन मुलगी आरोपीच्या मोबाईलवर कार्टून पाहण्यासाठी म्हणून गेली होती. यावेळी त्याने तिला जेवण दिले. त्यानंतर बागेत नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ५ मार्च २०२५ रोजी ही घटना घडली होती. याबाबत दखल दोषारोपनुसार जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात जलदगतीने खटल्याची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत ८ साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडित मुलीसह पंच, वैद्यकीय अधिकारी, पीडितेची आई, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासी अधिकारी म्हणून निवती पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.