महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अत्याचार प्रकरणी एकाला 20 वर्षांचा कारावास

06:25 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोक्सो विशेष न्यायालयाचा निकाल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा कठीण कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशा सी. एम. पुष्पलता यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

विक्रम बसवराज पट्टेकर (वय 22 रा. महादेव पेठ, मिरज, जि. सांगली) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो कुडची येथील आपल्या नातेवाईकांकडे येत होता. यावेळी एका अल्पवयीन मुलीशी त्याने मैत्री केली. त्यानंतर दि. 22 ऑक्टोबर 2016 रोजी कुडची येथून त्या मुलीचे अपहरण केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका गावामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

या घटनेनंतर कुडची पोलीस स्थानकात मुलीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भादंवि 376, 341, 506 आणि पोक्सो 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला. तात्कालिन पोलीस निरीक्षक बी. एस. लोकापूर यांनी येथील पोक्सो न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले होते. न्यायालयात 14 साक्षीदार, 45 कागदपत्रे व 11 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये विक्रम हा दोषी आढळला. त्यामुळे न्यायालयाने त्याला 20 वर्षांची कठीण शिक्षा आणि 10 हजार दंड, तसेच सदर पीडित मुलीला 1 लाख रुपये नुकसानभरपाई सरकारतर्फे देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article