महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला 20 वर्षांचा कारावास

11:33 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विशेष पोक्सो न्यायालयाचा आणखी एक निकाल

Advertisement

बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 20 वर्षांचा कठीण कारावास आणि 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हनुमंत पुंडलिक चिपलकट्टी (वय 26 रा. बसरगी, ता. सौंदत्ती) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. हनुमंतने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. त्यानंतर गोनगनूर येथे नेऊन तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. दि. 7 नोव्हेंबर 2019 रोजी त्याने गोनगनूर येथील एका जंगल भागातील टेकडीवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीने विरोध केला. मात्र त्याने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले. याबाबत घरातील किंवा इतर कोणालाही माहिती दिली तर तुला जीवे मारू, अशी धमकीही त्याने दिली होती.

Advertisement

अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यानंतर घरच्यांनी तिची शोधाशोध केली असता ती सापडली. यावेळी तिने घडलेली घटना सांगितली. सौंदत्ती पोलीस स्थानकामध्ये हनुमंतवर भादंवि 366, 376 (2) (आय) (एन), 506 आणि पोक्सो 6 अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एम. आय. नडवीनमनी यांनी येथील विशेष पोक्सो न्यायालयामध्ये दोषारोप दाखल केले. न्यायालयामध्ये साक्षी, पुरावे व मद्देमाल तपासण्यात आले. यामध्ये हनुमंत हा दोषी आढळल्याने 20 वर्षांचा कठीण कारावास आणि 10 हजार रुपये दंड न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी सुनावला आहे. विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी सरकारतर्फे काम पाहिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article