For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तासगावमध्ये घरफोडीतील आरोपी सोन्याच्या दागिन्यांसह जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

05:16 PM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
तासगावमध्ये घरफोडीतील आरोपी सोन्याच्या दागिन्यांसह जेरबंद  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
Advertisement

सांगली : तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे उघड्या घरातून चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सिद्धार्थ संजय गुरव (वय 20, रा. साळसिंगे रोड, विटा, ता. खानापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 42 ग्रॅम वजनाचे सुमारे 6 लाख 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

Advertisement

याप्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 385/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन लक्ष्मण गुरव (रा. गव्हाण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करत होते.

Advertisement

2 सप्टेंबर रोजी पथक तासगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना तासगाव कॉलेज ते भिलवडी बायपास मार्गावरील एमएसईबी कार्यालयासमोर एक तरुण चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे नेकलेस, चैन, मिनी गंठण, कर्णफुले, अंगठी आणि बदाम आदी सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांच्या चौकशीत हे दागिने गव्हाण येथील घरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

जप्त मुद्देमाल आणि संशयित आरोपीला पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

.