For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हद्दवाढीच्या विरोधासाठी 20 गावांचा ‘एल्गार’

11:31 AM Mar 25, 2025 IST | Pooja Marathe
हद्दवाढीच्या विरोधासाठी 20 गावांचा ‘एल्गार’
Advertisement

१८ गावे, २ औद्योगिक वसाहतीत कडकडीत बंद : व्यावसायिकांचा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद : बाजार पेठेत शुकशुकाट, कोटयावधींचे व्यवहार ठप्प : आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्धार

Advertisement

कोल्हापूर

शहराच्या हद्दवाढीला विरोध म्हणून प्रस्तावित २० गावांनी (१८ गावे आणि दोन औद्योगिक संस्था) सोमवारी कडकडीत बंद पाळला. गल्लीबोळासह बाजारपेठेत शुकशुकाट होता. यामुळे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प झाले. एकतर्फी शहराची हद्दवाढीचा निर्णय घेतल्या पुढचे आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisement

कोल्हापूर शहराची ५२ वर्षामध्ये एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे हद्दवाढीच्या समर्थनार्थ कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी रविवारी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. तर दुसरीकडे हद्दवाढीच्या विरोधासाठी कोल्हापूर महापालिका शहर हद्दवाढ विरोधी समितीनेही अक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनीही रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हद्दवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन केले. 20 गावांतील सरपंचाचे म्हणणे ऐकून घ्यावे. परस्पर जबरदस्तीने, एकतर्फी आणि घाईगडबडीत याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.

याचबरोबर हद्दवाढीला प्रखर विरोध असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी हद्दवाढ विरोधी समितीने प्रस्तावित २० गावांना सोमवारी गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला १८ गावे आणि २ औद्योगिक वसाहतीने कडकडीट बंद ठेवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. १०० टक्के बंद यशस्वी झाल्याचे हद्दवाढ विरोधी समितीने दावा केला आहे. या बंदमुळे २० गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

प्रथम शहर सक्षम करा
हद्दवाढीला ग्रामपंचायतींचा प्रचंड विरोध आहे. १५ वा वित्त आयोग, १६ वा वित्त आयोगा, खासदार, आमदार फंड, जिल्हा परिषद फंड अशा प्रकारे गावांना फंड मिळत असून गावाचा विकास होत आहे. या उलट शहरात सुविधा मिळत नाही. त्यांनी प्रथम शहरात पायाभूत सुविधा द्याव्यात. शहरात जावे अशी विकासकामे करावीत आणि मग हद्दवाढीच विचार करावा,. अशी भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली.

बळजबरीने निर्णय घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र
हद्दवाढीच्या विरोधातील बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. तरीही बळजबरी अथवा ताकदीच्या जोरावर काही निर्णय घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल. न्यायालयासोबत रस्त्यावरचीही लढाई लढू, अशी भूमिकाही हद्दवाढ समितीने घेतली आहे.

एल्गार ग्राम रक्षणाचा...
हद्दवाढ विरोधी कृती समितीने हद्दवाढीला विरोध असल्याचे अनेक कारणे पुढे केली आहेत. यामध्ये प्रामुख्यांनी शेत जमिनीवर आरक्षण टाकरणे, बिल्डर लॉबीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांच्याकडून झाला आहे. यामुळे हद्दवाढ विरोधी कृती समितीने एल्गार ग्राम रक्षणाचा हे ब्रिदवक्य घेवून ते रस्त्यावर उतरले आहेत. यासंदर्भातील फलकही २० गावात सोमवारी झळकले होते.

तीन गावातील व्यवहार सुरळीत
पुलाची शिरोली, नागांवसह गांधीनगर बाजरपेठमध्ये व्यवहार सुरळीत होते. पुलाची शिरोली, नागांवमध्ये आठवडी बाजार नियमित झाला,. तर गांधीनगरने हद्दवाढीला पाठींबा दिला पण बाजारपेठ सुरू ठेवली होती. इतर ठिकाणी मात्र, १०० टक्के बंद यशस्वी झाला.

कोल्हापूर महानगरपालिका प्रस्तावित हद्दवाढी विरोधात हद्दवाढ विरोधी कृती समितीने २० गावे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला ग्रामीण जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सर्च २० गावातील सर्वच व्यवहार ग्रामीण जनतेने उस्फुर्तपणे बंद ठेवून त्यांना हद्दवाढ नकोच आहे हे दाखवून दिलं आहे. सर्व गावात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत बंद पार पडला. येणारे काळात हा लढा आणखी तीव्र करू.
सचिन चौगले, माजी सरपंच वडणगे, समन्वयक हद्दवाढ विरोधी कृती समिती

Advertisement
Tags :

.