For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्युच्युअल फंडात 20 हजार कोटींची भर

06:38 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्युच्युअल फंडात 20 हजार कोटींची भर
Advertisement

म्युच्युअल फंडस् इन इंडियाची माहिती: वर्षाच्या आधारावर 48 टक्के वाढ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (सिप)अंतर्गत गुंतवणुकीचा आकडा 20 हजार कोटींच्या वर पोहोचला आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

एप्रिल महिन्यामध्ये सिपच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये एकंदर 20371 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये सिपच्या माध्यमातून 13728 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. वर्षाच्या आधारावर पाहता यावेळची फंडातील गुंतवणूक ही जवळपास 48 टक्के अधिक असल्याची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. यंदा या आधीच्या मार्च महिन्यामध्ये म्युच्युअल फंडामध्ये सिपच्या माध्यमातून 19 हजार 270 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. म्हणजेच महिन्याच्या आधारावर पाहता एप्रिलमध्ये गुंतवणुकीत 5 टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

ओपन एंडेड इक्विटीत घसरण

एप्रिलमध्ये ओपन एंडेड इक्विटी फंडामध्ये 16 टक्के इतकी घसरण गुंतवणूकीत दिसली आहे. यामध्ये 18,917 कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. या आधीच्या म्हणजेच मार्च महिन्यात याच प्रकारात 22 हजार 633 कोटी रुपयांची गुंतवणूक दिसून आली होती. एप्रिल 2024 मध्ये म्युच्युअल फंड सिप खात्यांची संख्या 8.70 कोटी इतकी झाली आहे. मार्चमध्ये ही संख्या 8.39 कोटी होती.

Advertisement
Tags :

.