महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भंडारी समाजाला 20 टक्के आरक्षण द्यावे

11:46 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोमंतक भंडारी समाजाच्या बैठकीत मागणी : शिक्षण, राजकारणासह सर्व स्तरांवर हवे

Advertisement

पणजी, पर्वरी : राज्यातील भंडारी समाजाला किमान 20 टक्के आरक्षण मिळायला हवे आणि ते  शिक्षण, राजकारण यासह सर्व स्तरांवर देण्यात यावे, अशी मागणी भंडारी समाजाचे निमंत्रक उपेंद्र गावकर यांनी केली आहे. संपूर्ण राज्यात निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या भंडारी समाजाची आहे. त्यात अन्य मागासवर्ग म्हणून 27 टक्के राखीवता आहे. या ओबीसीमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन आदींच्या मिळून 19 ज्ञाती आहेत. पुढे त्यात आणखी दोन ज्ञातींचाही समावेश होणार आहे. त्यामुळे राखीवता जरी 27 टक्के असली तरी सर्वाधिक मोठा समाज असूनही या विभागणीमुळे भंडारी समाजाला राखीवतेची टक्केवारी अत्यल्प मिळत आहे, ती 20 टक्क्यांपर्यंत मिळणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. समाज संघटनेतर्फे पर्वरीत काल शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Advertisement

आजपासून जनजागृती करणार

याबाबत जनजागृती चालू करणार आहे. ही जनजागृती शनिवार दि. 2 मार्चपासून करणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशा 12 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे प्रतिनिधी उद्यापासून गावोगावी फिरून जनजागृती करणार आहेत, असे गांवकर यांनी सांगितले.

नाईक समिती बेकायदेशीर

वर्ष 2018 मध्ये 25 नोव्हेंबर रोजी गोमंतक भंडारी समाजाची निवडणूक घेण्यात आली. या समितीचा कार्यकाळ 2021 मध्ये संपला आहे. निर्वाचित अध्यक्ष अशोक नाईक यांनी ऑगस्टमध्ये कोरोना काळात ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया केली होती, जी घटनाबाह्य आहे. त्यांनी अनधिकृतपणे अडीच वर्षे बेकायदेशीररित्या समिती चालवली असून ती आम्हाला मान्य नाही, तिचा आम्ही निषेध करतो, असे गावकर म्हणाले.

स्वमर्जीतील पदाधिकारी घोषीत

त्या समितीत सरचिटणीस म्हणून आपलीही निवड झाली होती. मात्र या समितीने ऑनलाईनच्या माध्यमातून निवडणूक घेतली व स्वमर्जीतील पदाधिकारी विजयी घोषित केले. यातील सर्वाधिक सदस्य हे फोंडा तालुक्यातील आहेत. त्यावरून ही समिती पूर्णत: बेकायदेशीर असल्याचे सिद्ध होते, असा आरोप गांवकर यांनी केला आहे. आजच्या बैठकीत आम्ही असा निर्णय घेतला आहे, की अशोक नाईक यांनी स्वत:हून दि. 1 एप्रिल 2024 पर्यंत पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू., असे गावकर म्हणाले.

जनगणना सुरु करावी

जी जनगणना 2011 मध्ये करण्यात आली होती, ती व्यवस्थित झाली नव्हती. सरकारकडे आम्ही मागणी करतो की ताबडतोब जनगणना प्रक्रिया सुऊ करावी, सरकारला आमची मदत हवी असेल तर ती करण्यास आम्ही तयार आहोत. आज आम्ही सर्व तालुक्यातील ज्ञाती बांधव एकत्र येऊन एकमताने सर्व निर्णय घेतले आहेत. आजच्या बैठकीला बाराही तालुक्यातील ज्ञातीबांधव उपस्थित होते, असे गावकर यांनी  सांगितले.

अशोक नाईक समितीने पायउतार व्हावे

अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या विद्यमान समितीच्या एकूण कारभाराचा आम्ही निषेध करत आहोत. येत्या 1 एप्रिलपर्यंत या समितीने पायउतार व्हावे. तसेच समाजाची सर्वसाधारण सभा बोलवून सर्व कागदपत्रे आमच्याकडे सुपूर्द करावीत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपेंद्र गावकर यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article