For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशात 20 मंत्री शपथबद्ध

06:35 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशात 20 मंत्री शपथबद्ध
Advertisement

मुख्यमंत्री मोहन यादव मंत्रिमंडळाचा विस्तार

Advertisement

वृत्तसंस्था / भोपाळ

मध्यप्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात आता 28 सहकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून तो करीत असताना जातीय समीकरणांकडेही लक्ष देण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सर्व मंत्र्यांना राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ राजभवनातील कार्यक्रमात दिली आहे.

Advertisement

28 मंत्र्यांमध्ये 18 कॅबिनेट स्तराचे, तर 10 राज्यमंत्री आहेत. या मंत्र्यांमध्ये सात सामान्य वर्गातील, 11 अन्य मागासवर्गियांमधील, 6 अनुसूचित जमातींमधील तर 4 अनुसूचित जातींमधील आहेत. 3 डिसेंबरला विधानसभा निवडणुकांची मतगणना झाली होती. मध्यप्रदेशात भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले होते. या राज्यात पक्षाला 230 पैकी 163 जागा मिळाल्या होत्या. या राज्यासह भाजपने राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही मोठा विजय मिळविला होता.

6 मंत्र्यांना स्वतंत्र पदभार

राज्यमंत्र्यांपैकी सहा मंत्र्यांकडे स्वतंत्र पदभार सोपविण्यात आला आहे. तर कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, कैलाश सारंग, तुलसी सिलावट यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. मात्र, मागच्या मंत्रिमंडळातील केवळ सहा मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ मुख्यत: नव्या चेहऱ्यांचे असल्याचे स्पष्ट होत आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.

लोकसभा निवडणुकीवर लक्ष

हा मंत्रिमंडळ विस्तार लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून करण्यात आला आहे, असा मतप्रवाह आहे. नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यासाठी अनेक जुन्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हे मंत्रिमंडळ समतोल असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वाजपेयींच्या जन्मदिनी विस्तार

भारतीय जनता पक्षाचे प्रथम पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सोमवारी 99 वा जन्मदिन होता. त्याच दिवसाचे औचित्य साधून मध्यप्रदेशातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या धोरणानुसार तो करण्यात आला असून विविध समाजघटक आणि राज्याचे विभाग लक्षात घेऊन करण्यात आल्याचे या पक्षाच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नव्या मंत्र्यांची सूची

सर्वसाधारण वर्ग : विश्वास सारंग, राकेश सिंग, गोविंदसिंग राजपूत, प्रद्युम्नसिंग तोमर, कैलाश विजयवर्गीय, चैतन्य काश्यप, राकेश शुक्ला, हेमंत खंडेलवाल आणि दिलीप जयस्वाल.

अन्य मागासवर्गीय : प्रल्हाद पटेल, कृष्णा गौर, इंदरसिंग परमार, नरेंद्र शिवजी पटेल, लखन पटेल, एंदलसिंग कौसाना, नारायणसिंग कुशवाह, नारायण पवार, राव उदयप्रताप, आणि धर्मेंद्र लोधी.

अनुसूचित जाती : राधा सिंग, संपतीया उईके, विजय शाह आणि निर्मला भुरीया.

अनुसूचित जाती : तुलसी सिलावट, प्रतिमा बागरी, गौतम टेंटवाल आणि दिलीप अहिरवार.

Advertisement
Tags :

.