वाळवा येथे हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून 20 लाखांचे नुकसान
वाळवा येथील हुतात्मा चौकातील आ†भजीत पाटील यांच्या मालकीचे हार्डवेअरचे दुकान सोमवारी मध्यरात्री लागलेला आगीमध्ये जळून खाक झाले. दुकानातील हार्डवेअरचे सर्व मटेरियल पीव्हीसी पाईप, जी.आय. पाईप, प्लास्टिक एलबो, दुकानातील बिलिंगचा कम्प्युटर, लाकडी कपाट असे वीस लाखांचे नुकसान झाले आहे.
सोमवारीमध्य रात्री सुमारे 2 ते 3 च्या दरम्यान ही आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुकानांमध्ये आगीचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर शेजाऱ्यांना जाणीव झाली. त्यांनी दुकान मालकाला फोन केला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. इस्लामपूर नगरपालिका व हुतात्मा साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आा†ण त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु दुकानातील किमती सामान जळून खाक झाले होते. याबाबत आष्टा पोलिसांमध्ये अभिजित पाटील यांनी फिर्याद दिली असून आष्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. गायकवाड आधिक तपास करीत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळेत आल्यामुळे ब्रयापैकी नुकसान टळले. पाटील यांच्या हार्डवेअरच्या दुकानांमध्ये भरपूर किमती सामान होते. सुमारे 35 लाखांचा माल होता. परंतु 20 लाखांचा माल जळाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. आग कशामुळे लागली याचा नेमका अंदाज बांधता येत नाही. परंतु, शॉर्टसर्किटने आग लागली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.