For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदीच्या हवाई हल्ल्यात येमेनमध्ये 20 ठार

06:10 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदीच्या हवाई हल्ल्यात येमेनमध्ये 20 ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ सना

Advertisement

सौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात येमेनमध्ये वीस फुटीरतावादी लढाऊ ठार झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दक्षिणेकडील हद्रामौत प्रांतात घडली. येथील फुटीरतावादी संघटना, सदर्न ट्रान्झिशनल कौन्सिल (एसटीसी) च्या तळाला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात अन्य 20 हून अधिक लोक जखमीही झाले. दरम्यान, येमेनी सरकारने लष्करी कारवाईद्वारे फुटीरतावादी गटाकडून एक महत्त्वाचा लष्करी तळ पुन्हा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. सुरक्षा दल एसटीसीच्या नियंत्रणातून लष्करी तळ पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे हद्रामौतचे गव्हर्नर सलेम अल-खानबाशी यांनी स्पष्ट केले आहे. युएईने येमेनमधून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर दोनच दिवसांनी हा हल्ला झाला आहे. यापूर्वी, सौदी अरेबियाने युएईला माघार घेण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. एसटीसी ही येमेनच्या दक्षिणेकडील भागाला मुक्त करण्यासाठी लढणारी एक येमेनी फुटीरतावादी संघटना आहे. या संघटनेला युएईकडून पाठिंबा मिळतो.

Advertisement
Advertisement
Tags :

.