कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नायजेरियात गोळीबारात 20 जणांचा मृत्यू

06:22 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ अबुजा

Advertisement

नायजेरियाच्या जम्फारा प्रांतात एका गावात सशस्त्र टोळीने कमीतकमी 20 जणांची हत्या केली असून 30 च्या आसपास लोकांना जखमी केले आहे. डॅन गुलबी जिल्ह्यातील गोबिरावा चाली गावात दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी घरोघरी जात लोकांची हत्या केल्याची माहिती अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने दिली आहे. या टोळीचे पहिले लक्ष्य सोन्याची खाण ठरले, या खाणीत काम करणाऱ्या 14 जणांची हत्या करण्यात आली. यानंतर टोळीने लोकांच्या घरी जात बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याचा उद्देश स्पष्ट झाला नसला तरीही येथील टोळ्या संघर्षग्रस्त उत्तर क्षेत्रात सामूहिक हत्या करत खंडणीसाठी लोकांचे अपहरण करत असतात.

Advertisement

नायजेरियाच्या खनिजसमृद्ध उत्तर-पश्चिम क्षेत्रात सुरक्षेचा अभाव असल्याने सशस्त्र टोळ्या गावांवर आणि प्रमुख रस्त्यांवर हल्ले करत असतात. डॅन गुलबी जिल्ह्यात टोळ्यांनी वारंवार हल्ले केले आहेत. येथील लोक सातत्याने हल्ला होण्याच्या भीतीत जगत आहेत. तसेच हल्ल्यानंतर अनेक लोक बेपत्ता असल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article