गुजरातमध्ये वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांकडून शोक व्यक्त
रविवारी झालेल्या अनपेक्षित आणि मुसळधार पावसाने गुजरातमध्ये 20 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहीती समोर येत आहे. गुजरातमधील अतिवृष्टी झालेल्या अनेक भागांमध्ये वीज कोसळून अनेक नागरीक बळी पडले असून हा या संबंधईची माहीती स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. . रविवारी राज्यात पडलेल्या अवकाळी पावसात विजेच्या धक्क्याने हे बळी गेले.
दाहोद, भरूच, तापी, अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोताड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका यां जिल्ह्यांमध्ये झालेल्या विजेच्या गडगडामुळे जोरदार अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजिवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत.
या नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या लोकांच्य़ाविषय़ी केंद्रीय गृमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तीव्र दु:ख व्यक्त करताना म्हणाले, "गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. स्थानिक प्रशासन मदत कार्यात गुंतले आहे, जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे." असा संदेश त्यांनी दिला.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने सोमवारी पावसाचा जोर कमी होण्याची आशा व्यक्त केली. गुजरातमधील 252 पैकी 234 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50- 117 मिमी इतका लक्षणीय पाऊस नोंदवला गेला आहे. यामुळे सामान्य जीवन विस्कळीत होऊन आणि पिकांचे नुकसान झाले आहे.