विजेत्या केकेआरला 20 कोटीचे बक्षीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरने सनराजयर्स हैदराबादचा एकतर्फी धुव्वा उडवित तिसऱ्यांदा स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक खेळाडूंना भरघोस बक्षिसे देण्यात आली. बीसीसीआयने एकूण 46.5 कोटी रुपयांचे बक्षीस वितरण केले.
जेतेपद मिळविणाऱ्या केकेआरला 20 कोटी रुपये तर उपविजेत्या सनरायजर्स हैदराबादला 13 कोटी रुपये देण्यात आले. याशिवाय राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांनाही बऱ्यापैकी मोठी रक्कम मिळाली. तिसरे स्थान मिळविणाऱ्या राजस्थानला 7 कोटी तर चौथे स्थान मिळविणाऱ्या आरसीब्ला 6.5 कोटी रुपये मिळाले.
आयपीएलमधील पुरस्कार विजेते
विजेता संघ केकेआर, 20 कोटी रुपये
उपविजेता संघ सनरायजर्स हैदराबाद, 12.5 कोटी रुपये
तिसरे स्थान राजस्थान रॉयल्स, 7 कोटी
चौथे स्थान आरसीबी, 6.5 कोटी
ऑरेंज कॅप विराट कोहली (741 धावा), 10 लाख
पर्पल कॅप हर्षल पटेल (24 बळी), 10 लाख
महत्त्वाचा खेळाडू सुनील नरेन, केकेआर, 12 लाख
उदयोन्मुख खेळाडू नितिश कुमार रेड्डी 10 लाख
फँटसी प्लेअर सुनील नरेन, 10 लाख
सर्वाधिक चौकार ट्रॅव्हिस हेड, 64 चौकार, 10 लाख
सर्वाधिक षटकार अभिषेक शर्मा, 42 षटकार, 10 लाख
सर्वोत्तम झेल रमनदीप सिंग, 10 लाख
फेअर प्ले पुरस्कार सनरायजर्स हैदराबाद
खेळपट्टी व मैदान हैदराबाद क्रिकेट संघटना, 50 लाख.