For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साबरमती एक्स्प्रेसचे 20 डबे घसरले

06:38 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
साबरमती एक्स्प्रेसचे 20 डबे घसरले
Advertisement

‘घात की अपघात’ याबाबत साशंकता : सुदैवाने जीवितहानी टळली

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

अहमदाबाद साबरमती एक्स्प्रेस शनिवारी पहाटे ऊळावरून घसरली. वाराणसीहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे किमान 20 डबे शनिवारी पहाटे कानपूरमधील भीमसेनजवळ ऊळावरून घसरले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दुर्घटनेबाबत संशय व्यक्त करत ‘हा घात की अपघात?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. एक्स्प्रेसचे इंजिन एका कठीण वस्तूला धडकल्यानंतर रुळ तुटल्यामुळे अनेक डबे मार्गावरून घसरल्याचे त्यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीसही यावर काम करत आहेत.

Advertisement

देशाच्या विविध भागातून सातत्याने येणाऱ्या रेल्वे अपघातांच्या बातम्यांच्या यादीत उत्तर प्रदेशातील कानपूरचे आणखी एक नाव जोडले गेले आहे. गोविंद पुरीच्या पुढे होल्डिंग लाइनवर डबे ऊळावरून घसरले. अपघातानंतर टेनमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त एक्स्प्रेस वाराणसीहून अहमदाबादला जात असताना दुर्घटना घडली. त्यानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी ट्रॅकच्या दुऊस्तीचे काम दुपारपर्यंत सुरू होते. साबरमती एक्स्प्रेस ऊळावरून घसरल्याने मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे मार्ग वळवले गेले.

Advertisement
Tags :

.