For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

20 बांगलादेशींना दिल्लीत अटक

07:00 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
20 बांगलादेशींना दिल्लीत अटक
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील एसआयआर प्रक्रियेपूर्वी आग्नेय जिल्हा पोलिसांनी 20 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 12 पुरुष, 8 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. सर्वांनी बनावट ओळखपत्रे बनवली होती. दिल्ली पोलीस आता ही बनावट ओळखपत्रे बनवणाऱ्या लोकांचा शोध घेत आहेत. बांगलादेशी घुसखोरांबाबत पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त कारवाई करून त्यांना पकडले. आता सर्वांना एका डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यांना बांगलादेशला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.