महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

2 हजार वर्षे जुनी अजब ममी

06:22 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात अनेक रहस्यमय गोष्टी असून त्याविषयी कळल्यावर लोक थक्क होत असतात. जगात एक अत्यंत रहस्यमय ममी आहे. ही ममी 2000 वर्षे जुनी असूनही याचे पूर्ण शरीर सुरक्षित आहे. ही एका चिनी महिलेची ममी असून तिचे नाव ‘द लेडी ऑफ दई किंवा शिन झुई’ आहे. या महिलेचा मृत्यू ख्रिस्तपूर्व 78 ते 145 सालादरम्यान झाला होता. 1971 मध्ये एका दुर्घटनेमुळे या महिलेची कब्र आढळून आली होती, येथील ममी पाहिल्यावर जीवाश्मतज्ञ चकित झाले होते. या महिलेचे अवयव अद्याप सुस्थितीत असल्याचे पाहून वैज्ञानिक दंग झाले आहेत. शिन झुईच्या कब्रनजीक ठेवण्यात आलेली सामग्री पाहता ती एक अत्यंत श्रीमंत महिला होती, असे स्पष्ट होते. जिवंत असतानाही ती अत्यंत श्रीमंत राहिली असावी. या महिलेला आतापर्यंतची सर्वात सुरक्षित ममी ठरविण्यात येत आहे. अद्याप या महिलेच्या त्वचेची स्थिती चांगली असून नसांमध्ये रक्त देखील आहे.

Advertisement

वैज्ञानिकांनी महिलेच्या मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या पोटात आणि आतड्यांमध्ये टरबूजाचे 100 बीज आढळून आले आहेत. स्वत:च्या मृत्यूपूर्वी महिलेने टरबूज खाल्ले असावे असे मानले जात आहे. 2 हजार वर्षांनंतरही या महिलेचा मृतदेह इतका सुरक्षित कसा याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. ही महिला अत्यंत श्रीमंत असल्याने तिच्या मृतदेहाला रेशीम आणि लिनेनच्या कपड्यामध्ये 18 आवरणांमध्ये बांधण्यात आले होते. महिलेच्या शवपेट्टीला एका अजब पदार्थाने भरण्यात आले होते. हे पारंपरिक हर्बल सोल्युशन होते, ज्याच्या मदतीने मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आला होता, असे विश्लेषकांचे मानणे आहे.

Advertisement

शिन झुई मृत्यूपूर्वी अत्यंत आजारी होती, असा निष्कर्ष पॅथोलॉजिस्ट यांनी काढला आहे. टरबूज खाल्ल्यावर या चिनी महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचे मानले गेले. महिलेच्या नसांमध्ये अद्याप रक्ताच्या गुठळ्या आहेत. मृत्यूच्या समयी या महिलेचे वय 50 वर्षे राहिले असेल. महिलेचे वजन अधिक होते आणि तिला मधूमेह  होता असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article