For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुपवाडा येथे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

06:31 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुपवाडा येथे 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement

12 तासांपर्यंत चालली चकमक : एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न उधळला

Advertisement

वृत्तसंस्था/ कुपवाडा

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे मंगळवारी सकाळी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 13 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजल्यापासून एलओसीनजीक कुंबकडीच्या जंगलात मोहीम सुरू होती. दहशतवाद्यांनी येथून घुसखोरीचा प्रयत्न केला होता, जो सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे.

Advertisement

नियंत्रण रेषेनजीक सैन्याला संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या, ज्यानंतर क्षेत्रात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न दहशतवादी करत होती. परंतु सैन्याने त्वरित प्रत्युत्तरादाखल कारवाई करत त्यांना रोखले. यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले, ज्यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. सैन्य अद्याप या भागात शोधमोहीम राबवत असल्याचे समजते.

घुसखोरीचा हा प्रयत्न पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन आणि दहशतवादी कारवायांना बळ पुरविण्याच्या सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांचा हिस्सा असू शकतो असे सैन्याधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर वाढली सतर्कता

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सुरक्षा दल दहशतवादी, त्यांचे सहकारी आणि समर्थकांच्या विरोधात सातत्याने व्यापक कारवाई करत आहेत. दहशतवादविरोधी रणनीतित करण्यात आलेल्या बदलाच्या अंतर्गत ही कारवाई केली जात आहे. केवळ बंदुकधारी दहशतवाद्यांवर लक्ष देण्याऐवजी दहशतवादाच्या पूर्ण व्यवस्थेला नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. ड्रग तस्कर आणि हवाला  रॅकेटही टार्गेटवर आहे, कारण त्यांच्याकडून मिळणारा पैसा दहशतवादाला पुरविण्यासाठी वापरला जात असल्याचे समोर आले आहे.

ऑपरेशन गु•र

यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी सैन्याने काश्मीरच्या कुलगाम येथे चकमकीदरम्यान 2 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले होते. गु•रच्या जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमक झाली होती. सैन्याने याला ‘ऑपरेशन गु•र’ नाव दिले होते. यादरम्यान जखमी झालेले दोन सैनिक हुतात्मा झाले होते. तर ऑपरेशन  गु•रमध्ये शोपियांचा रहिवासी असलेला दहशतवादी अहमद डार मारला गेला होता. तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता.

Advertisement
Tags :

.