महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नई विमानतळावर 2 तस्करांना अटक

06:22 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

22 विदेशी प्राणी हस्तगत

Advertisement

चेन्नई

Advertisement

चेन्नई विमानतळावर विदेशी पाळीव प्राण्यांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना सीमाशुल्क विभागाने अटक केली आहे. थायलंडमधून आलेला मोहम्मद मीरा सरधरालीकडून 22 वन्यजीव प्रजाती जप्त करण्यात आल्या आहेत. यात एक सियामंग गिब्बन (इंडोनेशिया आणि मलेशियात आढळणारे माकड), दोन सुंडा फ्लाइंग लेमर्स, एक लाल पाय असलेले कासव, 5 इंडो चेन बॉक्स कासव, विशेष प्रकारची 10 कासवं, झाडावर राहणारे हिरव्या रंगाचे अजगर, तर पांढऱ्या रंगाचा अजगर हस्तगत करण्यात आला आहे. विमानतळाबाहेर प्रवासी आणि प्राण्यांच्या रिसिव्हरला अटक करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत कोलाथुर येथील एका घरात झडती घेण्यात आले असता तेथेही वन्यजीव आढळून आले. यात एक भारतीय कासव, ट्रायकारिनेट पर्वतीय कासव, स्टार कासव, रॉयल बॉल अजगर सामील आहे.

Advertisement
Next Article