महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2 पाकिस्तानी नागरिकांना इंदोर विमानतळावर रोखले

06:03 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युएईला डिपोर्ट केले जाणार

Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisement

संयुक्त अरब अमिरातच्या शारजाह येथून मंगळवारी मध्यप्रदेशच्या इंदोर येथे पोहोचलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना विमानतळावरच रोखण्यात आले. व्हिसामध्ये तांत्रिक गडबड आढळल्याने या प्रवाशांना रोखण्यात आले. या दोन्ही प्रवाशांना दिल्ली येथे जायचे होते. परंतु ते इंदोर विमानतळावर पोहोचले. या दोन्ही पाकिस्तानी नागरिकांना शारजाह येथे डिपोर्ट केले जाणार आहे.

पाकिस्तानी वंशाचे विक्की कुमार आणि पूनम कुमारी मंगळवारी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमधून शारजाह येथून इंदोर पोहोचले. व्हिसा अटींनुसार दोघांनी दिल्लीत उतरणे अपेक्षित होते. यानंतरच त्यांना अन्य शहरांमध्ये जाण्याची अनुमती होती. परंतु चुकून इंदोर येथे पोहोचल्याने त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले.

इंदोरच्या देवी अहिल्याबाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीदरम्यान दोन्ही प्रवाशांना रोखण्यात आले. दोघांनाही विमानतळाबाहेर जाण्याची अनुमती नव्हती. गुरुवारी रात्रीच त्यांना शारजाह येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article