निफ्टी निर्देशांकात 2 नव्या समभागांची एंट्री
07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई : गुरुवारी 27 रोजी बाजाराचे सत्र संपल्यानंतर 2 नव्या कंपन्यांची एंट्री निफ्टी 50 च्या निर्देशांकांमध्ये झाली आहे. झोमॅटो लिमीटेड आणि जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपन्यांचे समभाग निर्देशांकामध्ये शुक्रवारपासून पहायला मिळतील. बाजाराचे सत्र संपल्यानंतर निफ्टी 50 च्या यादीमधून भारत पेट्रोलियम कॉर्पेरेशन लिमीटेड (बीपीसीएल) व ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांचे समभाग बाहेर पडणार आहेत. निफ्टी निर्देशांकात दर सहा महिन्यानंतर बदलाच्या संदर्भात विचार केला जात असतो. कंपन्यांचे सध्याचे बाजार भांडवल आणि तरलता या पार्श्वभूमीवर निर्देशांकात कंपन्यांचा समावेश करण्याचे ठरविले जात असते.
Advertisement
Advertisement