For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलेशियात नौदलाची 2 हेलिकॉप्टर्स धडकली

06:41 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मलेशियात नौदलाची 2 हेलिकॉप्टर्स धडकली
Advertisement

चालक दलाच्या 10 सदस्यांचा मृत्यू : संचलनाच्या रंगीत तालिमीवेळी दुर्घटना

Advertisement

वृत्तसंस्था/ क्वालांलपूर

मलेशियाच्या नौदलाची दोन हेलिकॉप्टर्स मंगळवारी आकाशात परस्परांना धडकली आहेत. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल मलेशिन नेव्ही परेडची रंगीत तालीम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. तर मारले गेलेले सर्वजण नौदलाचे सदस्य होते अशी माहिती मलेशियाच्या नौदलाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

लुमुत नौदल तळावर मंगळवारी सकाळी 9.30 वाजता ही दुर्घटना घडली आहे. सर्व मृतदेह लुमुत वायुतळाच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत, तेथे त्यांची ओळख पटविली जाणार आहे. सर्व मृतांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते असे समजते.

हेलिकॉप्टर्सच्या टक्करचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नौदलाला 90 वर्षे पूर्ण होणार असल्याने विशेष संचलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संचलनासाठी रंगीत तालीम सुरू असताना एचओएम (एम503-3) हेलिकॉप्टर हे फेनेक हेलिकॉप्टरच्या रोटरला धडकले. यानंतर फेनेक हेलिकॉप्टर नजीकच्या एका स्वीमिंग पूलमध्ये कोसळले. तर एचओएम हेलिकॉप्टर लुमुत तळाच्या स्टेडियमनजीक दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी एक टीम तपास करत असल्याची माहिती मलेशियाच्या नौदलाने दिली आहे.

नौदलाचे आयोजन टळणार

मलेशियाचे संरक्षणमंत्री दातुक सेरी मोहम्मद यांनी घटनास्थळी जात जनतेला दुर्घटनेचा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. तर दुर्घटनेनंतर मलेशियाचे राजे सुल्तान इब्राहिम यांनी पीडित परिवारांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्घटनेच्या चौकशीवर नजर ठेवून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर रॉयल मलेशियन नेव्हीच्या 90 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित होणारा सोहळा लांबणीवर पडू शकतो.

Advertisement
Tags :

.