महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

9 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 2 लाख कोटींची वाढ

06:40 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारती एअरटेल मूल्य वाढीत आघाडीवर : सेन्सेक्स 1700 अंकांनी होता वाढला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आघाडीवरच्या 10 पैकी 9 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 2,01,552 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या नंबरची मोठी कंपनी भारती एअरटेलचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळाले.

समभागांमध्ये गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांचा कल मागच्या आठवड्यात अधिक दिसून आला. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1707 अंकांनी किंवा 2.10 टक्के इतका वाढला होता. यायोगे 83,116 चा सर्वोच्च स्तरही सेन्सेक्सने गाठला होता.

भारती एअरटेलसह टीसीएसचे मूल्य वाढले

भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य 54,282 कोटी रुपयांनी वाढत 9,30,490 कोटी रुपयांवर पोहचले. याच कंपनीचे बाजारमूल्य मागच्या आठवड्यात सर्वाधिक वाढलेले दिसले. याचदरम्यान आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 29,662 कोटी रुपयांनी वाढत 8,80,867 कोटी रुपयांवर पोहचले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 23,427 कोटींनी वाढत 16,36,189 कोटी रुपयांवर पोहचले आहे. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 22,438 कोटी रुपयांच्या वाढीसह 6,89,358 कोटी रुपयांवर तर एचडीएफसी बँकेचे मूल्य 22,093 कोटी रुपयांनी वाढत 12,70,035 कोटी रुपयांवर पोहचले होते. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजारमूल्य 9,878 कोटी रुपयांच्या वाढीसह 19,92,160 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे 17,480 कोटींनी वाढत 8,07,299 कोटी रुपयांवर व आयटीसीचे 15,194 कोटींनी वाढत बाजार भांडवल मूल्य 6,42,531 कोटी रुपयांवर पोहचले.

विदेशी गुंतवणूकदारांनी 27,856 कोटी गुंतवले

विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 27,856 कोटी रुपयांची भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक केली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत ही गुंतवणूक बाजारात झाली आहे. अमेरिकेत होणाऱ्या व्याजदर कपातीकडे गुंतवणूकदार डोळे लावून बसले आहे. भारतीय शेअरबाजाराची वाटचाल भक्कम असून ती पाहुनच विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सुरुच ठेवली आहे. यावर्षी पाहता आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी एकंदर 70,737 कोटी रुपयांची बाजारात गुंतवणूक केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article