For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅव्हलर दरीत कोसळून उत्तराखंडमध्ये 2 ठार

06:28 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रॅव्हलर दरीत कोसळून उत्तराखंडमध्ये  2 ठार
Advertisement

16 जणांची प्रकृती गंभीर : चालक मद्यधुंद अवस्थेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नैनीताल

उत्तराखंडमधील नैनीताल येथे पर्यटक-भाविकांनी भरलेली एक टेम्पो ट्रॅव्हलर 50 फूट खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. कैंची धाम येथे बाबा नीब करोरी यांचे दर्शन घेतल्यानंतर चालकासह 18 पर्यटकांचा गट दिल्लीला परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये एक चालक आणि एका पर्यटकाचा समावेश आहे. अपघातावेळी ट्रॅव्हलरचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

कैंची धाम येथून परतणाऱ्या दिल्लीतील पर्यटकांनी भरलेली टेम्पो ट्रॅव्हलर ज्योलिकोटमधील दोगावजवळ नियंत्रण गमावून 60 फूट खोल दरीत पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना दरीबाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख पटली असून टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक सोनू कुमार (32, रोहतक, हरियाणा येथील रहिवासी) आणि गौरव बन्सल (दिल्ली, बदरपूर) अशी त्यांची नावे आहेत.

दिल्लीतील बदरपूर येथील रहिवासी असलेल्या पर्यटकांचा गट बाबा नीब करोरी यांचे दर्शन घेण्यासाठी कैंची धाम येथे आला होता. ते शनिवारी रात्री उशिरा टेम्पो ट्रॅव्हलरमधून दिल्लीला परतत होते. दोगाव परिसरातील मटियाली बंद येथे ट्रॅव्हलर अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याने 60 फूट खोल दरीत पडली. त्यानंतर अपघातस्थळी आरडाओरडा व गोंधळ सुरू झाला. सदर रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ज्योलिकोट चौकीचे प्रमुख श्याम सिंग बोरा इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दोन तासांच्या बचावकार्यानंतर जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. जखमींपैकी पाच पर्यटकांना दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतरांवर सुशीला तिवारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Tags :

.