कापड निर्यातीत झाली 2 टक्के वाढ
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या कापड निर्यातीने मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात 2.1 टक्के इतकी वाढ नोंदवली असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या आर्थिक वर्षात भारताने 3.16 लाख कोटींच्या कापडाची निर्यात करण्यात यश मिळवले आहे.
याआधीच्या वर्षात 3.09 लाख कोटी रुपयांच्या कापडाची निर्यात केली गेली होती. अमेरिकेकडून टॅरीफ कराचा बोजा असतानाही भारताच्या कापड क्षेत्राची झालेली निर्यात चांगलीच म्हणायला हवी. 10 टक्केपासून कराची सुरुवात होऊन 50 टक्क्यापर्यंत कर आकारणी अमेरिकेकडून झाली.
शुल्क आकारणीचे त्रांगडे
फेब्रुवारी 2026 पर्यंत हीच करप्रणाली कापड उद्योग निर्यातीसाठी राहिली. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांच्या कर आकारणीविरोधात निकाल दिला. नंतर ट्रम्प यांनी सर्व देशांना 10 टक्के इतके शुल्क निश्चित केले. कापडाची जागतिक मागणी ही स्थिर राहिली होती. भारताला इतर कापड निर्यात देशांशी स्पर्धा करत निर्यातीवर लक्ष केंद्रीत करावे लागते.