महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मांडरेतील लोकनियुक्त सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

03:47 PM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गायरानमधील अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Advertisement

कसबा बीड/ वार्ताहर

Advertisement

गायरानातील असलेले बेकायदेशीर अतिक्रमण चौकशीत सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मांडरे (ता. करवीर)  येथील लोकनियुक्त सरपंच कृष्णात रामचंद्र सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्या मुक्ताबाई रघुनाथ सुतार व सदस्य राजाराम नामदेव जगताप यांना अपात्र घोषित केले आहे. या कारवाईमुळे गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. मांडरे ग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता (२०२२ - २६) कृष्णात रामचंद्र सुतार यांनी लोकनियुक्त सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र भरून शासकीय मिळकतीमध्ये अतिक्रमण केले नसले बाबत स्वयंघोषणापत्र दाखल केले होते. या निवडणुकीत ते निवडून आले. मात्र त्यांनी ग्रामपंचायतच्या गट नं. २७५ मध्ये त्यांच्या पूर्व हक्कदार यांनी घर बांधकाम केल्याचे तसेच ताबा सोडला नसल्याचेही मान्य केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (१) (ज-३) अन्वये सुतार यांना लोकनियुक्त सरपंचपदी अपात्र ठरवावे अशी तक्रार हंबीरराव  आप्पासो देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  केली होती.

यानुसार अर्जदार हंबीरराव देसाई व प्रतिवादी कृष्णात सुतार यांची सुनावणी घेऊन दोघांचे  म्हणणे तसेच दाखल केलेल्या कागदपत्रांची तपासणीनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख आणि विशेष उपअधिक्षक भूमि अभिलेख, करवीर यांचेकडील अतितातडी हदूद कायम मो.र.नं.१७६११/२०२२ दिनांक ०७/०८/२०२३ रोजीच्या मोजणी नकाशामध्ये सदरची मिळकत ही खुली असलेचे नमूद केलेले आहे. परंतु सदर मिळकत गायरान गट नं. २७५ मध्ये आहे असे नकाशात दिसून येते. तसेच किमान २०११- २०११ पासून सदरील मिळकतीवर प्रतिवादी  यांचे नाव ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीला आहे आणि वर्ष २०१७-२०१८, ते  २०२२-२०२३ ला सुध्दा त्यांनी स्वतः या मालमत्तेचा मालमत्ता कर भरला आहे. यावरुन असे स्पष्ट होत आहे की, प्रतिवादी व  त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून  अतिक्रमण सुरु असून ते त्याचा उपभोग घेत असलेचे स्पष्ट होत आहे असल्याचे कारणाने  सुतार यांचे सरपंच पद रद्द केल्याचे घोषित केले.

त्याचबरोबर गायरान गट नंबर २७५ मधील अतिक्रमण बाबत कांचन सर्जेराव सुतार यांनी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई रघुनाथ सुतार यांचे सदस्यत्व रद्द  करावे तसेच संजय विष्णू सुतार यांनी राजाराम नामदेव जगताप यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे यासाठी तक्रार दाखल केली होती. यां दाव्याबाबतही जिल्हाधिकारी यांनी अर्जदार व प्रतिवादी यांची सुनावणी घेऊन दोघांचे  म्हणणे तसेच दाखल केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून मुक्ताबाई रघुनाथ सुतार  व राजाराम नामदेव जगताप यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केल्याचे  घोषित केले. एकाच वेळी सरपंच व दोन सदस्य अपात्र झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. यां जागेसाठी निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार, याची चर्चा  आता रंगू लागली आहे.

मी कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. जिल्हाधिकारी यांनी दिलेला  अपात्रतेचा निर्णय आम्हाला  मान्य नाही. यां निर्णयाविरुद्ध विभागीय आयुक्त,पुणे विभाग यांचे न्यायालयात अपील केले आहे. तेथे आम्हाला नक्की न्याय मिळेल.

कृष्णात सुतार, सरपंच मांडरे

Advertisement
Tags :
#grampanchayat#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article