महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेशात ज्वेलर्समध्ये भरदिवसा 2 कोटींचा दरोडा

07:00 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रोख रक्कम, दागिन्यांसह दरोडेखोर पसार

Advertisement

वृत्तसंस्था/सुलतानपूर

Advertisement

उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये भरदिवसा एका ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला. सुलतानपूरमधील मेजरगंज भागात प्रसिद्ध सराफा व्यावसायिक भरतजी सोनी यांच्या ज्वेलर्समध्ये घुसून पाच दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन कोटी ऊपयांची रोकड लंपास केली. बुधवारी दुपारी 12 वाजता 5 चोरटे दुकानात घुसले. आत जाताच त्यांनी काही क्षणात आपल्याकडील हत्यारांचा धाक दाखवत ज्वेलर्समालक व ग्राहकांवर ताबा मिळवला. चोरट्यांच्या भीतीने दुकानमालक बेशुद्ध पडला. याचदरम्यान दुकानातील सर्व दागिने दोन बॅगमध्ये भरून चोरट्यांनी पळ काढला. दरोड्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यातून चोरट्यांचा सुगावा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

मास्क आणि हेल्मेट परिधान करून आलेल्या शस्त्रधारी चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताच पिस्तूल दाखवून सर्वांना नियंत्रित केले. यानंतर संपूर्ण दुकानाची झडती घेण्यात आली. चोरट्यांनी बॅगेत सोने, चांदी आणि रोख रक्कम भरून पळ काढला.  त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची 6 पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय नजीकच्या जिह्यातील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. या घटनेवरून सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article