युवकास लूटमार करणारे 2 सराईत गुन्हेगार गजाआड
सातारा :
सातारा शहरातील चारभिंतीचे परिसरामध्ये एका युवकास लाकडी दांडक्याने मारहाण करून लुटणारे दोन सराईत आरोपींना सातारा शहर पोलीस ठाण्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यश सुरेश शिंदे (वय 22 रा. रविवार पेठ सातारा), सौद अहमद खान (वय 21 रा. शाहुनगर, जगतापवाडी सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक युवक एस.टी. स्टॅन्ड ते पोवई नाका असे पायी चालत जात असताना त्याचे तोंड ओळखीने दोन युवक त्याला रस्त्यामध्ये भेटले. त्यानी त्याला दारू पिण्यास पैसे मागितले. परंतू या युवकाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला दोघानी गाडीवर जबदस्तीने बसवून त्याचे पैसे जबरदस्तीने घेवून त्यातून दारू खरेदी केली. व जबरदस्तीने चारभिंती परिसरामध्ये घेवून गेले. तेथे त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. आणि त्याला सोडून पळून गेले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी युवकाकडून या युवकांची माहिती घेतली. त्यानुसार रेकॉर्डवरील एका संशयितास ताब्यात घेतले. या संशयिताकडे कसोशीने चौकशी करीत असताना त्याने हा गुन्हा अन्य एका साथीदारासोबत केला असल्याचे सांगितले. त्याचे अन्य एका साथीदारास देखील ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी मारहाण करून चोरी केलेला मोबाईल, मोटारसायकल व इतर ऐवज असा एकूण 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजीत भोसले, सुनील मोहिते, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेली आहे.