9 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 2.34 लाख कोटींनी वाढ
सेन्सेक्स 1650 अंकांनी होता वधारला : इन्फोसिस एकमात्र नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या 10 पैकी 9कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख 34 हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले. मागच्या आठवड्या मध्ये बीएसई सेंसेक्स निर्देशांक 1650 अंकांनी म्हणजेच जवळपास दोन टक्के इतका दमदार वाढला होता. एकंदर पाहता नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2,34,565.53 कोटी रुपयांनी वाढलेले होते. इन्फोसिस या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य मात्र घसरणीत पाहायला मिळाले.
यांच्या मूल्यात झाली वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवलमूल्य तर हजार 69,556 कोटी रुपयांनी वाढत 20 लाख 51 हजार 590 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल यांचे बाजार भांडवल मूल्य 51,860 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 56 हजार 329 कोटी रुपयांवर पोहोचले आहे एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल मूल्य 37,342 कोटी रुपयांनी वाढत 15 लाख 44 हजार 624 कोटी रुपयांवर याच दरम्यान बजाज फायनान्स से बाजार भांडवल मूल्य 26000 37 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 88 हजार 213 कोटी रुपयांवर तर आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 24,649 कोटी रुपयांनी वाढत 10लाख 43 हजार 37 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दरम्यान जीवन विमा क्षेत्रातील कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मूल्य 13,250 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 5 हजार 523 कोटी रुपयांवर आणि स्टेट बँकेचे बाजार भांडवल मूल्य 8389 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 18 हजार 788 कोटी रुपयांवर पोहचले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 3183 कोटी रुपयांनी वाढत 12 लाख 45 हजार 761 कोटी रुपयांवर पोहोचले. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवल मूल्य 293 कोटींनी वर वाढत 5 लाख 41 हजार 850 कोटी रुपयांवर पोहोचले.
इन्फोसिसचे मूल्य घसरले
नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य वाढलेले असले तरी आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य मात्र घसरणीत होते. मागच्या आठवड्यात 5 494 कोटी रुपयांनी घसरत 6 लाख 68 हजार 256 कोटी रुपयांवर घसरले होते.