महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

5 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 2.23 लाख कोटींची घट

06:25 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

आघाडीवरच्या 10 पैकी 5 कंपन्यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यामध्ये 2.23 लाख कोटी रुपयांनी घटले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या बाजार भांडवलात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

Advertisement

मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1475 अंकांनी कोसळला होता. आघाडीवरच्या दहापैकी पाच कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 2 लाख 23 हजार 660 कोटी रुपयांची घसरण झालेली आहे.

मागील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यांच्या बाजार भांडवलामध्ये मात्र मागच्या आठवड्यामध्ये वाढ झाली होती. रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल 81 हजार 763 कोटींनी घटून 19 लाख 19 हजार 595 कोटी रुपयांवर घसरले होते. एलआयसीचे बाजार भांडवल 63 हजार 629 कोटींनी घटून 5 लाख 84 हजार 967 कोटी रुपयांवर आले होते. एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 50 हजार 111 कोटी रुपयांनी घटून 6 लाख 53 हजार 281 कोटी रुपयांवर घसरले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article