महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोपा मनोहर विमानतळावर 2.22 कोटीचे सोने जप्त

12:57 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन संशयितांना अटक : 3.5 किलो सोने जप्त : अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू

Advertisement

पणजी : मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआयआर गोवाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत 2 कोटी 22 लाख ऊपये किंमतीचे 3.5 किलो सोने जप्त केले असून या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. डीआयआर अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करून, त्यांनी 18 डिसेंबर रोजी अबुधाबीहून इंडिगो फ्लाइट 61506 ने आलेल्या नितेश सैनी या आंतरराष्ट्रीय प्रवाशाला रोखले. त्याच्या साहित्याच्या झडतीदरम्यान अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, फ्लोअर स्प्रिंग मशीन (दरवाजांसाठी) जे तो त्याच्या चेक-इन बॅगमध्ये घेऊन जात होता, तो नेहमीपेक्षा जड होता आणि मशीनच्या एक्स-रे तपासणीत काही गोष्टी लपविल्याचे दिसून आले. फ्लोअर स्प्रिंग मशीन सर्व बाजूंनी सील केल्यामुळे ते तपासणीसाठी उघडले गेले. ते उघडल्यानंतर त्यात 3.5 किलो वजनाच्या घन सोन्याच्या डिस्क आणि रॉड कल्पकतेने लपविल्याचे आढळून आले. संशयित प्रवाशाची चौकशी केली असता मोहम्मद रफिक नावाच्या एका व्यक्तीची माहिती समोर आली. रफिक विमानतळाबाहेर त्याच्याकडून सोने घेण्यासाठी येत होता. त्यानंतर सापळा रचून प्रवाशाकडून सोने घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीलाही अडवण्यात आले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपी म्हणजे वाहक आणि प्राप्तकर्ता यांना सीमा शुल्क कायदा 1962 च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article