कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Breaking : कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात बिबट्याचा हल्ला !

01:16 PM Nov 11, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                               बिबट्याची  शहरात घुसखोरी, परिसरात तणाव

Advertisement

कोल्हापूर : शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात आज सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनचालकांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली होती.

Advertisement

या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीपासूनच परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. तरीही आज सकाळी पुन्हा विवेकानंद कॉलेजजवळ बिबट्या दिसल्याची नवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि कॉलेज परिसरात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी काही भागांत वाहतूक वळवली आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना शांत राहण्याचे व बिबट्या आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

सध्या वन विभागाचे  बिबट्याला शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न  सुरू असून, त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत.

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaKolhapur Breakingkolhapur newsleaopord newsleapord attackmharastra news
Next Article