Kolhapur Breaking : कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरात बिबट्याचा हल्ला !
बिबट्याची शहरात घुसखोरी, परिसरात तणाव
कोल्हापूर : शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात आज सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनचालकांना बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली होती.
या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीपासूनच परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. तरीही आज सकाळी पुन्हा विवेकानंद कॉलेजजवळ बिबट्या दिसल्याची नवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि कॉलेज परिसरात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी काही भागांत वाहतूक वळवली आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना शांत राहण्याचे व बिबट्या आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
सध्या वन विभागाचे बिबट्याला शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असून, त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत.