For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोन पे कंपनीला 197 कोटीचा नफा

06:01 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोन पे कंपनीला 197 कोटीचा नफा
Advertisement

महसुलात कंपनीची दमदार कामगिरी : चांगली राहणार वाटचाल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फिनटेक क्षेत्रातील कंपनी फोन पे यांनी आपला तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनी नफ्यात आली आहे. कंपनीने 74 टक्के वाढीसह आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 5064 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. याआधीच्या वर्षात कंपनीने 2914 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला होता.

Advertisement

वॉलमार्टचे पाठबळ असणाऱ्या कंपनीने करपश्चात 197 कोटी रुपये इतका आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा मिळवला आहे. याआधीच्या वर्षी कंपनीला 738 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

काय म्हणाले सीईओ

याचदरम्यान फोन पे कंपनीचे सीईओ समीर निगम यांनी कंपनीच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, कंपनी पेमेंट व्यवसाय अधिकाधिक प्रगती साधण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी काळातही कंपनी नफ्यात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे. वित्त व्यवस्थापनाचे नियोजनही चोखपणे केले जाणार असल्याचा खुलासा कंपनीने केला आहे.

अनोखा विक्रम

याचदरम्यान फोन पेने एक नवा विक्रम आपल्या व्यवसायात केला आहे. कंपनीने दरदिवशीचा व्यवहाराचा टप्पा 270 दशलक्ष इतका पार करण्यात यश मिळवलं आहे. वार्षिक तत्वावर या व्यवहारांचे मूल्य 1.5 ट्रिलियन इतके होते, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.