‘1920 : कोल्ड विंटर’मध्ये अन्या सिंह
अहान शेट्टी नायकाच्या भूमिकेत
हिंदी चित्रपटसृष्टीत भयपटांची व्याख्या बदलणारा दिग्दर्शक विक्रम भट्टचा पुढील चित्रपट ‘1920 : कोल्ड विंटर’ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. ‘हाँटेड 3डी-इकोज ऑफ द पास्ट’नंतर विक्रमने पूर्ण लक्ष ‘1920 : कोल्ड विंटर’वर केंद्रीत केले असून यात अहान शेट्टी मुख्य भूमिकेत असणार आहे.
आता या भयपटासाठी अभिनेत्रीचे नाव निश्चित झाले आहे. विक्रमची 1920 हॉरर थ्रिलर फ्रेंचाइजी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय फिल्म फ्रेंचाइजीपैकी एक मानली जाते. याच्या पुढील चित्रपटात अहानसोबत अन्या सिंह ही अभिनेत्री दिसून येणार आहे. विक्रमने अन्याची निवड केली आहे. अन्या यापूर्वी आर्यन खानची वेबसीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. त्या सीरिजमध्ये स्वत:च्या कमाल अभिनयाने तिने सर्वांची मने जिंकली होती.
‘1920 : कोल्ड विंटर’द्वारे अन्या ही अहान शेट्टीसोबत दुसऱ्यांदा काम करणार आहे. यापूर्वी दोघांची जोडी ‘बॉर्डर 2’मध्ये दिसून आली होती. बॉर्डर 2 चित्रपटात अन्याने अहानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
