'पुष्पा २' पाहण्याला जाताना १९ तरुणाने गमावला जीव
रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेची धडल लागल्याने मृत्यू
'अलु अर्जून' चा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा २' आज प्रदर्शित झाला. 'पुष्पा' च्या पहिल्या भागाच्या यशानंतर 'पुष्पा २' चे वेध प्रेक्षकांना चांगलेच लागले होते. काही सिनेमांनी तर 'पुष्पा २' सोबत आपले सिनेमे प्रदर्शित न करण्याचेही निर्णय इंडस्ट्रीमध्ये घेतले गेले. अशा बहुचर्चित सिनेमाच्या प्रिमियरला इतकी गर्दी झाली की एका महिलेचा गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याची एक घटना नुकतीच घडली. तर १९ वर्षीय एका तरुणाचा 'पुष्पा २' पाहयला जाताना मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार प्रवीण तामाचलम असे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रविण हा मुळचा आंध्रप्रदेश येथील श्रीकाकुलम चा असून नोकरीनिमित्त तो बशेट्टीहल्ली येथे राहत होता. त्याला 'पुष्पा २' पाहण्याची उत्सुकता असल्याने त्याने आपल्या दोन मित्रांसमवेत या सिनेमाला जायचे ठरविले होते. सिनेमाला जाताना रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना रेल्वेची धडक लागून प्रविण चा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रविणच्या दोनही मित्रांनी तेथून पळ काढला. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सकाळी १० च्या 'पुष्पा २' च्या शो जाताना ही घटना घडली. 'पुष्पा २' च्या प्रिमियरला झालेल्या गर्दीत एका महिलेचा जीव गुदमरून गेल्या यासंदर्भात पोलिसांनी अभिनेता 'अलु अर्जुन' याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.