Sangli Crime : निंबवडेत किरकोळ कारणातून मारहाण, 19 जणांवर गुन्हा
आटपाडी नजीक तरूणावर हल्ला,
आटपाडी : भांडण का काढले म्हणून विचारणा केल्याचा राग मनात धरून निंबवडे (ता. आटपाडी) येथील तरूणाची गाडी अडवून मारहाण केल्याप्रकरणी चार ज्ञात आणि १५ अज्ञात अशा १९ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत सुमित मारूती मेटकरी हा तरूण जखमी झाला आहे.
जखमी सुमित मेटकरी याच्या फिर्यादीवरून शहाजी किसन देवडकर, गणेश कैलास देवडकर, ओम गणपत पाटील, आनंदा ईश्वर देवडकर (सर्व रा.निंबवडे) यांच्यासह अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित मेटकरी याच्या फिर्यादीनुसार दोन वर्षापुर्वी शहाजी किसन देवडकर व विक्राम देवडकरयांचे भांडण झाले होते. त्यावेळी शहाजी देवडकर यास विक्रमसोबत का भांडण काढले, अशी विचारणा केली होती. तेव्हापासून शहाजी देवडकर चिडुन होता.२१ डिसेंबर रोजी सुमित हा मित्र संजय नाना बुधाबले, समाधान गणपत पिंजारी, करण बिरा पिंजारी यांच्यासह दिघंची येथे जेवण करण्यासाठी गेला. जेवणकरुन गावी येवुन तेथुन चिंचणीयेथे देवदर्शनासाठी ही सर्व मंडळी निंबवडे येथून निघाले.
मुढेवाडी गावाजवळ गेल्यानंतर निंबवडे येथे त्यांच्या घराजवळ २५ ते ३० लोक आले होते. वडीलांनी त्याची माहिती दिल्यानंतर पुन्हा सुमित व सहकारी घराकडे निघाले. मानेटेक येथे त्यांच्या गाडीला शहाजी किसन देवडकर, गणेश कैलास देबडकर, ओम गणपत पाटील, आनंदा ईश्वर देवडकरआदिंनी अडविले. आणि गाडीतून बाहेर काढुन सुमित याला काठी व लोखंडी गजाने मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा सुमितला निंबवडे गावात देवडकर गल्ली येथे मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीच्या घटनेत गळ्यातील चैन, रोख रक्कम पडली. त्यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.