एटीएम फोडून १९ लाख लंपास
कोवाडमध्ये फिल्मीस्टाईलने चोरी
पोलीस नाकाबंदीच्या वाहनास चोरांची धडक
कोल्हापूरः
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी १८ लाख ७७ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली. कोवाड येथील स्टेट बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र नाकाबंदीसाठी असणाऱ्या पोलिसांच्या वाहनास धडक देऊन चोरटे पसार झाले. यानंतर काही अंतरावरच पोलिसांना चोरट्यांचे चारचाकी वाहन आणि गॅसकटर मिळून आले. याबाबतची फिर्याद बॅंकेचे शाखाधिकारी अशिष हरिषचंद्र रोकडे ( सध्या. रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी ७.३० ते रविवारी पहाटे पावणेएकच्या दरम्यान चोरट्यांनी गॅसकटरच्या सहाय्याने कोवाड येथील स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून रक्कम लांबविली. त्यामुळे कोवाड परिसरात एकट खळबळ उडाली. रोकड घेऊन चोरटे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
हा प्रकार ई- सर्व्हीस मुळे जिल्हा पोलीस विभागाला समजताच गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व नेसरी पोलीस ठाण्याला अलर्ट केले. त्यानंतर पाटील यांनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला. त्याचवेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली. पण कार भरधाव आल्यामुळे बॅरिकेट्स तोडून चोरट्यांनी कारसह हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला. दरम्यान, चोरट्यांनी कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली. त्यात टायर व एअरबॅग फुटल्याने कार हेब्बाळमध्येच सोडून रक्कम घेऊन चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. यावरून पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाला गती दिली आहे. चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक बी. ए. चोगुले यांनी गुन्हा नोंद केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. डोंबे करीत आहेत.
नेसरी पोलिसांच्या गाडीवर चोरट्याकडून हल्ला
दरम्यान पोलिसांनी वाहन तपासण्यासाठी लावलेले बॅरिकेटींग तोडून वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न करत सुसाट धावणा-या क्रेटा गाडीचा नेसरी पोलीसांनी पाठलाग केला. वाघराळी गावाजवळ क्रेटा चालकाने गाडी वळवून पोलीसांच्या हल्ला करण्याच्या उद्देशाने गाडीला ठोकर देवून पसार झाला आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या थरार नाटयाने खळबळ उडाली आहे.
कॉन्टेबल रामकुमार माने याबाबत फिर्याद नोंदविली आहे. कोवाड येथे घरफोडया झाल्यानंतर पोलीसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नेसरी-गडहिंग्लज मार्गावरील कोवाड फाटयावर शनिवारी रात्री पोलीसांनी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी केली होती. त्याचवेळी कोवाड कडून क्रेटा (एमएच 01 ईबी 9918) या क्रमांकाची गाडी आली. ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न बंदोबस्तला असणा-या पोलीसांनी प्रयत्न केले असता. क्रेटा गाडीने लावलेले बॅरिकेट्सला ठोकरून पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत गाडी गडहिंग्लजच्या दिशेने सुसाट घेवून गेली. यावेळी सहा. फौजदार राजू पताडे, हवालदार नामदेव कोळी, रामकुमार माने यांनी त्यांच्याकडे असणा-या बेलोरे (एमएच 09 एफव्ही 8540) गाडीतून तातडीने सदर क्रेटाचा पाठलाग सुरू केला. वाघराळीच्या दरम्यान या व्रेटा चालकाने पुन्हा गाडी वळवून पोलीस गाडीच्या दिशेने नेत पोलीसांच्या बेलोरे गाडीला समोरून ठोकरून 50 हजाराचे नुकसान करत गाडी हेब्बाळ-जलद्याळच्या दिशेने निघून गेले. अधिक तपास करता या क्रेटा गाडीचा मुळ नंबर (आरजे 45 सीवाय 1676) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीसांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नाने जोराची चर्चा झाली आहे. ही क्रेटा गाडी कोणाची ? आणि त्याचा चालक, मालक कोण याचा पोलीस तपास करत आहेत. हवालदार नामदेव कोळी अधिक तपास करत आहेत.