For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विजापूर जिल्ह्यात 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

10:46 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजापूर जिल्ह्यात 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंदगी पोलिसांकडून दोन घटनांचा उलगडा :37 दुचाकीसह चौघे अन् सव्वा दोन लाखाच्या दागिन्यांसह तिघे गजाआड 

Advertisement

वार्ताहर /विजापूर

विजापूर जिह्यातील सिंदगी पोलिसांनी मोठी कारवाई करून दोन वेगवेगळ्dया प्रकरणात सात चोरट्यांना अटक करण्यात आली. दुचाकी चोरीप्रकरणी चौघे आणि बँकेत चोरीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 18 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 37 दुचाकी आणि अंदाजे सव्वा दोन लाखाचे दागिने जप्त करण्यात आले. सदर माहिती विजापूर जिल्हा पोलीसप्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंदगी पोलिसांनी 16.65 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकीसह चौघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. सिंदगी नगर आणि पोलीस स्टेशन परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजापूरचे एसपी ऋषिकेश सोननवान, अतिरिक्त एसपी रामगौडा, शंकर मारिहाळ, डीवायएसपी जगदीश एच.  एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय नानागौडा आर., पोलीस पाटील व सिंदगीचे पीएसआय भीमप्पा एम. रबकवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.सिंदगी शहरातील बायपास रोडवर नंबरप्लेट नसलेल्या दोन मोटारसायकलींना अडविण्यात आले. यावेळी दुचाकीवरील चौघांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. शहापूर आणि यादगिरी जिह्यातील सुरापूर येथील बसवराज भीमन्ना हुनसिगीदादा (वय 31), हुलुगप्पा मारेप्पा कुकलोर (वय 22), कोंडय्या भीमराया पार्वतीदो•ाr (वय 22), रविकुमार देविंद्रप्पा पार्वतीदो•ाr अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी कलबुर्गी, यादगिरी आणि विजापूर जिह्यात दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

Advertisement

बँक आणि वित्तीय संस्थेत चोरी प्रकरणी तिघांना अटक

Advertisement

पोलिसांनी सिंदगी शहरातील विविध बँक आणि वित्त संस्थेत चोरीच्या गुह्याचा छडा लावला आहे. 10 रोजी सायंकाळी 4 वाजता सिंदगी-आलमेल रस्त्यावर डॉल्फिन ढाब्याजवळ पोलिसांनी वाहनांची तपासणी करून तिघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता तिघांनी सिंदगी शहरातील अन्नपूर्णा फायनान्स आणि एलअँडटी फायनान्स आणि इंडी शहरातील पीकेपीएस बँक लुटण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. बसवराज लक्ष्मण मदार (वय 28) याला अटक करून 2.20 लाखांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त केली.

Advertisement
Tags :
×

.