For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वय 184, आजही बळकट

06:29 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
वय 184  आजही बळकट
Advertisement

सरकारी बांधकामे टिकण्यापेक्षा कोसळण्यासाठी प्रसिद्ध असतात, असे बोलले जाते, याची आपल्याला महिती आहे. विशेषत: सेतू किंवा पूल हे अनेकदा बांधकाम होत असतानाच कोसळतात. निकृष्ट बांधकामांमुळे हे घडते. तथापि, स्वातंत्र्यपूर्व काळात असे प्रकार बव्हंशी होत नसत. त्याकाळी केलेली कित्येक सार्वजनिक बांधकामे आजही बळकटपणे उभी असून आपल्याला पूर्वीप्रमाणेच निदोष सेवा देत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे असाच एक ब्रिटीशकालीन सेतू आहे. हा सेतू त्याच्या भक्कम बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्याचे आजचे वय 184 वर्षांचे आहे. पण त्याची प्रकृती तो आणखी सव्वाशे वर्षे टिकू शकेल, अशी आहे. हा पूल स्थापत्यशास्त्र आणि ऐतिहासिक वारसा या दोन्ही दृष्टींनी महत्वाचा मानला जातो. या सेतूवरुन आजही लोकांची ये-जा होईल इतका तो घट्ट आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, या सेतूचे निर्माण कार्य कारागृहातील कैद्यांच्या कडून करुन घेण्यात आले आहे. चुना, रेती आणि दगड यांच्यापासून तो निर्माण केला गेला आहे. ऐतिहासिक वारसा म्हणून त्याची नोंद केली जावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. या सेतूचे बांधकाम करताना ब्रिटीशांनी त्यांच्या पारंपरिक बांधकाम शैलीचा उपयोग केला आहे. जौनपूरमधील इतर अनेक वास्तू, विशेषत: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निर्माण करण्यात आलेल्या वास्तू जीर्ण झाल्या आहेत. अनेक वास्तूंची पडझड होऊन त्या निरुपयोगी झाल्या आहेत. पण हा सेतू मात्र, त्याच्या गतवैभवाची साक्ष देत ताठ उभा आहे. सेतूचे बांधकाम कसे असावे, याचा हा सेतू म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ आहे, असे मानले जाते. या सेतूच्या भिंतीवर स्थापित शीलालेखात त्याची माहिती देण्यात आली आहे. 1841 मध्ये त्याचे निर्माणकार्य पूर्ण झाले. तो कैद्यांकडून निर्माण करण्यात आला आहे, हे या शीलालेखात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्या रचनेचा अभ्यास करण्यासाठी बांधकाम अभियांत्रिकी शिकणारे अनेक विद्यार्थी आणि बांधकाम तज्ञ आजही येथे आवर्जून येत असतात.

Advertisement
Advertisement
Tags :

.