राज्याच्या २५ जिल्ह्यातील १८० खेळाडूंचा सहभाग
सब ज्युनिअर आणि वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी भंडारा येथे निवड चाचणी
साताराः (औंध)
भंडारा येथील दसरा मैदान येथे सब ज्युनियर आणि वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघाची निवड चाचणी घेण्यात आली. निवड चाचणीतून निवडलेल्या संघ राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भिवानी (हरियाणा) येथे २७ ते २९ मार्च अखेर होणारी सब ज्युनियर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा आणि पंजाब (चंदीगड) येथे ३० मार्च ते २ एप्रिल अखेर होणारी वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील मुले आणि मुलींच्या संघाची निवड चाचणी महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल, सचिव डॉ. ललित जीवानी, सहसचिव श्याम देशमुख, सतिश इंगळे, महेश काळदाते यांच्या उपस्थितीत नुकतीच भंडारा येथे पार पडली. महाराष्ट्र अॅम्युचेअर नेटबॉल असोशिएन संघटनेच्या वतीने या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
येथील दसरा मैदानात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. निवड चाचणीत राज्याच्या २५ जिह्यातील १८० खेळाडू सहभागी झाले होते. अतिशय अटीतटीने झालेल्या स्पर्धेतून महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली आहे. निवडलेले संघ सब ज्युनिअर आणि वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सब ज्युनिअर (मुली) संघ:- सृष्टी घायाळ, लावण्या वैद्य, रिया मुळे, नंदिनी जगदवे, अंतरा चवरे, शारोण बहेकर, श्रेया कोसळे, नूतन बागडे गुंजन पाचे, तान्या भोर. सब ज्युनिअर (मुलांचा संघ) :- विशाल चौधरी, नवकार जैन, उमेश दैवाळकर, सागर सोंगोडे, श्याम चौहान, देवांशू गिरडकर, शील वानखेडे, उमंग कांबळे, सार्थक शेलार, सार्थक पवार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वरीष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी मुले आणि मुलींचा निवडलेला संघ खालीलप्रमाणे सिनियर मुली:- वैशाली वंजारी, पूर्वा कळंबे, साक्षी कालेवाड, प्रतीक्षा गजभिये, हृदया बुरेवार, प्रांजली साठे, प्रतीक्षा दुबे, पुर्वा कावळे, अंशू भावसार, पूजा श्रीखंडे. सिनियर मुलांच्या संघात विजय निखारे, पवन राऊत, समीर सिकिलकर, आशिष खोब्रागडे, सय्यद इरतिकाज, प्रथमेश जाधव, दीपांशू खटके, ऋतुराज यादव, अविनाश निंबार्ते, रितेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या सब ज्युनिअर आणि वरिष्ठ राष्ट्रीय संघातील खेळाडूंच्या करिता दहा दिवसाचा सराव प्रशिक्षण कॅम्प प्रोग्रेसिव्ह पब्लिक स्कूल भंडारा येथील मैदान सुरू करण्यात आल्याची माहिती सहसचिव श्याम देशमुख यांनी दिली.