महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रत्यक्ष कर संकलनात 18 टक्क्यांची वाढ

06:35 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरकारी तिजोरीत आले 19.58 लाख कोटी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मागील आर्थिक वर्ष सरकारी तिजोरीसाठी अत्यंत चांगले ठरले आहे. सरकारच्या करउत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन मार्च 2024 मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात वार्षिक आधारावर 17.7 टक्क्यांनी वाढून 19.58 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम  सुधारित अनुमानांपेक्षाही खूपच अधिक असल्याचे रविवारी म्हटले आहे.

प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कर संकलन 2023-24 दरम्यान अर्थसंकल्पीय अनुमानांपेक्षा 1.35 लाख कोटी रुपये (7.40 टक्के) आणि सुधारित अनुमानांपेक्षा 13 हजार कोटी रुपयांनी अधिक राहिले आहे. प्रत्यक्ष कर संकलनात प्राप्तिकर आणि कॉर्पोरेट कराची सर्वात मोठी हिस्सेदारी आहे.

2023-24 आर्थिक वर्षात सकल प्रत्यक्ष कर संकलन 18.48 टक्क्यांनी वाढून 23.37 लाख कोटी रुपये झाले आहे. परताव्यानंतर निव्वळ कर संकलनात 17.7 टक्क्यांची वाढ होत आकडा 19.58 लाख कोटी रुपये राहिला आहे.

प्रत्यक्ष कर संकलनाची आकडेवारी अर्थव्यवस्थेतील तेजी आणि व्यक्ती तसेच कंपन्यांच्या उत्पन्नातील वृद्धी दर्शविते. 2023-24 आर्थिक वर्षात एकूण 3.79 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच सीबीडीटीने दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.64 लाख कोटी रुपये राहिले होते. तर 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करसंकलनासाठी 18.23 लाख कोटी रुपयांचा अनुमान व्यक्त करण्यात आले होते. हा आकडा नंतर सुधारित करत 19.45 लाख कोटी रुपये करण्यात आला होता.

कॉर्पोरेट कर संकलनात वाढ

2023-24 या आर्थिक वर्षात कॉपोर्रेट कर संकलन मागील वर्षाच्या 10 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 13.06 टक्क्यांनी वाढले आहे. 11.32 लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. तर 2023-24 आर्थिक वर्षात सकल कॉर्पोरेट कर संकलन 9.11 लाख कोटी रुपये राहिले आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या 8.26 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा 10.26 टक्क्यांनी अधिक आहे.

वैयक्तिक प्राप्तिकर संकलनही वाढले

वैयक्तिक प्राप्तिकर संकलन वार्षिक आधारावर 24.26 टक्क्यांनी वाढून 12.01 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर सकल वैयक्तिक प्राप्तिकर संकलनात 25.35 टक्क्यांची वाढ झाली असून हा आकडा 10.44 लाख कोटी रुपये राहिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article