महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फेब्रुवारीत 18 लाख कोटी डिजिटल व्यवहार

06:31 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशात डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढले आहेत. ज्यामध्ये युपीआय (फेब्रुवारी 2024 मध्ये युपीआय व्यवहार) द्वारे होणारे व्यवहारही वेगाने वाढले आहेत. फेब्रुवारी महिन्यातच विक्रमी 122 कोटी व्यवहार झाले आहेत. ज्याची किंमत 18.2 लाख कोटी रुपये आहे. मात्र, हा आकडा जानेवारीत झालेल्या व्यवहारांपेक्षा कमी आहे. जानेवारी 2024 मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या 121 कोटी होती. ज्यामध्ये 18.4 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

Advertisement

युपीआयद्वारे कोट्यावधी रुपयांचे दैनंदिन व्यवहार एनपीसीआयने दैनंदिन युपीआय व्यवहारांच्या आकड्यांबाबतही माहिती दिली. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की देशात दररोज 40 हजार कोटी ते 80 हजार कोटी रुपयांचे व्यवहार युपीआय द्वारे केले जातात. याशिवाय एनइएफटी आणि आरटीजीएसद्वारे देखील मोठ्या प्रमाणात युपीआय व्यवहार दररोज केले जातात.

 भारताचा वाटा 46 टक्क्यांचा

जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये भारतातील डिजिटल व्यवहारांचा वाटा 46 टक्के आहे. मार्चच्या सुरुवातीलाच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल व्यवहारांची माहिती दिली होती. 2023 पर्यंत युपीआयद्वारे देशातील ऑनलाइन पेमेंट व्यवहार 80 टक्क्यांवर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले होते. युपीआयचा लोक मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.

फेब्रुवारीत अन्य माध्यमातून केलेले

ऑनलाइन व्यवहार

- आरटीजीएसद्वारे 146 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

-इंटरनेट बँकिंगद्वारे 91.24 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

-एनईएफटीच्या माध्यमातून 33.85 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

-मोबाईल बँकिंगद्वारे 28.16 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article