For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनमध्ये घुसखोरीवेळी चेंगराचेंगरीत 18 ठार

06:23 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्पेनमध्ये घुसखोरीवेळी चेंगराचेंगरीत 18 ठार
Advertisement

हजारो स्थलांतरित समुद्रमार्गे दाखल : लष्कराने अटकाव केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर

Advertisement

वृत्तसंस्था

सेउटा

Advertisement

स्पेनच्या उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील सेउटा या छोट्या शहरात एक गंभीर मानवतावादी आणि सुरक्षा संकट निर्माण झाले आहे. चांगल्या भविष्याच्या शोधात मोरोक्कोमधील हजारो स्थलांतरितांनी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून समुद्रमार्गे स्पेनमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आणि समुद्र ओलांडण्याच्या धोकादायक प्रयत्नांमध्ये आतापर्यंत किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. घुसखोरांच्या हजारोंच्या संख्येमुळे परिस्थिती स्फोटक बनल्याने सीमेवर कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी स्पॅनिश सरकारला लष्कर तैनात करावे लागले आहे.

सेउटा सीमेवर तैनात असलेल्या सिव्हिल गार्डच्या अधिकाऱ्यांच्या मते, सध्याची परिस्थिती पूर्णपणे गोंधळाची आहे. स्थलांतरितांची संख्या प्रचंड असल्यामुळे घुसखोरांचा अचूक आकडा देणे कठीण आहे. तरीही प्राथमिक माहितीनुसार घुसखोरांचा आकडा काही हजारांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. अजूनही कित्येक लोक सतत सीमा ओलांडत असल्यामुळे सीमा सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये, ताराजल समुद्रकिनाऱ्यामार्गे स्थानिक रस्त्यांवरून मोठ्या संख्येने लोक स्पेनमध्ये दाखल होत आहेत. यात प्रामुख्याने तरुण मोरोक्कन पुरुषांचा समावेश आहे. तथापि, स्थलांतरितांच्या या गर्दीत काही महिला आणि लहान मुलांसह कुटुंबांचाही समावेश आहे. तथापि, इतक्या मोठ्या संख्येने लोक अचानक तिथे का जमले हे अस्पष्ट आहे. हे लोक केवळ आर्थिक संधींच्या शोधात येथे येत असल्याचे सांगितले जात आहे. या संकटाचे पडसाद इटलीपर्यंत उमटत आहेत. इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी शेंगेन करार निलंबित केला जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

स्पॅनिश सरकारची कठोर भूमिका

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, स्पॅनिश सरकारने सिव्हिल गार्डला मदत करण्यासाठी लष्करी तुकड्या पाठवल्या आहेत. प्रशासनाने माद्रिदला राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ आणि गृहमंत्री फर्नांदो ग्रांदे-मार्लास्का परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सेउटा येथे वैयक्तिकरित्या भेट दिली. सीमेवर तैनात असलेले काही लोक ‘स्पेन जिंदाबाद’ अशा घोषणा देत असल्याचेही दिसून येत होते.

Advertisement
Tags :

.