For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एव्हेन्यू सुपरमार्टच्या महसुलात 18 टक्के वाढ

06:08 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
एव्हेन्यू सुपरमार्टच्या महसुलात 18 टक्के वाढ
Advertisement

मुंबई :

Advertisement

डीमार्ट रिटेल चेन स्टोअर चालविणारी एव्हेन्यू सुपरमार्ट यांचा समभाग सोमवारी 3 टक्के इतका तेजीत असताना पहायला मिळाला. आर्थिक वर्ष 2025-26 च्या जानेवारी-मार्चच्या शेवटच्या तिमाहीतील दमदार कामगिरीचा परिणाम समभागावर दिसून आला.

मार्च तिमाहीत एव्हेन्यू सुपरमार्टच्या महसूलात 18 टक्क्यांची तेजी पहायला मिळाली. कंपनीने या दरम्यान 17204 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. इंट्रा डेदरम्यान कंपनीचा समभाग 3.5 टक्के वाढत 4512 रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीच्या महसुलातील कामगिरीचा विचार करून ब्रोकरेज फर्मदेखील या समभागाच्या बाबतीत खरेदीसाठी सकारात्मक कल दर्शवत आहेत.

Advertisement

मार्च 2026 मध्येसुद्धा नव्या स्टोअर्सची संख्या वाढविण्यामध्ये कंपनीने यश मिळविले आहे.

जानेवारी-मार्च तिमाहीत 17204 कोटींचा महसूल

जानेवारी-मार्च तिमाहीत 58 नवी स्टोअर्स सुरु

Advertisement
Tags :

.