For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारवाडमध्ये प्राप्तिकर छाप्यात 18 कोटी रुपये जप्त

06:10 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
धारवाडमध्ये प्राप्तिकर छाप्यात  18 कोटी रुपये जप्त
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

धारवाड जिल्ह्यातील दासनकोप्प येथे मंगळवारी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका फ्लॅटमध्ये सुमारे 18 कोटींची रोकड आढळली आहे. सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. दासनकोप्प क्रॉसजवळ अर्ना रेसिडेन्सीवर बसवराज दत्तनवर यांच्या निवासस्थानावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी छापा टाकला. इमारतीच्या फ्लॅट क्र. 303 मध्ये स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. छाप्यावेळी आढळलेले 18 कोटी रुपये कोणाचे आहेत, याविषयी तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.