For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदगडच्या जंगमहट्टीत 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा खून; प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचा संशय

12:46 PM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंदगडच्या जंगमहट्टीत 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा खून  प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचा संशय
Advertisement

चंदगड : चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षद प्रकाश हुंदळेकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

Advertisement

हर्षदचे आपल्या चुलत बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी किर्तीकुमार रामू कुट्रे (28), दिलीप ऊर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (29) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्गेकर (24) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, किर्तीकुमार याने बनावट इन्स्टाग्राम खात्याच्या माध्यमातून हर्षदशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला पार्ले येथे बोलावून त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

खून केल्यानंतर हर्षदचा मृतदेह तिलारी येथील स्वप्नवेल दरीत फेकण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार सध्या स्वप्नवेल दरी परिसरात मृतदेहाचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. या घटनेमुळे चंदगड परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.