महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जमिनीत मिळाला 17 हजार वर्षे जुना खजिना

06:30 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगभरात वैज्ञानिक असे नवे शोध लावत असतात, जे लोकांना थक्क करून सोडणारे असतात. तसेच या शोधांमुळे हजारो वर्षांपूर्वी माणूस कशा स्थितीत राहत होता हे समजते. अलिकडेच इटलीत देखील आर्कियोलॉजी साइटनजीक उत्खननात काही चकित करणाऱ्या गोष्टी सापडल्या आहेत. जमिनीत उत्खनन करताना पुरातत्व तज्ञांना 17 हजार वर्षे जुन्या मुलाचे अवशेष मिळाले आहेत. हे अवशेष अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत.

Advertisement

अवशेषांची तपासणी करण्यात आली असता चकित करणाऱ्या प्रथांविषयी खुलासा झाला आहे. तज्ञांकडून सांगाड्याचे विश्लेषण करण्यात आले असता हिमयुगादरम्यान हृदयरोगामुळे मुलाचा मृत्यू झाला होता, तेव्हा तो केवळ 16 महिन्यांचा होता असे समोर आले. यासंबंधीची माहिती एका नियतकालिकात प्रकाशित झाली आहे. इटलीच्या मोनोपोलीमध्ये ग्रोट्टा डेल्ले मुरा गुहेत उत्खनन करताना मुलाचे थडगे दिसून आले होते. अनेक वर्षांपासून त्याचे अध्ययन सुरू आहेत. मुलाचे हे अवशेष किमान 17 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जात आहे. तो काळ हिमयुगाचा आहे. हे अवशेष अत्यंत चांगल्या प्रकारे संरक्षित होते, जे गुहेत दोन विशाल खडकांनी झाकलेले होते. नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित अध्ययनानुसार अवशेषांच्या डीएनए विश्लेषणातून मुलाचे निळे डोळे, काळी त्वचा आणि करड्या रंगाचे केस होते. तर मुलाची आई स्वत:च्या गरोदरपणाच्या अवस्थेदरम्यान गंभीर स्वरुपात कुपोषित होते असेही स्पष्ट झाले आहे.

Advertisement

या अध्ययनाच्या सह-लेखिका फ्लोरेन्स विद्यापीठाच्या मानवशास्त्रज्ञ एलेसेंडा यांनी या शोधाला एक उल्लेखनीय कामगिरी ठरविले आहे. मुलाच्या या अवशेषातून आम्हाला शिशूचा वंश, शारीरिक वैशिष्ट्यो आणि काही आरोग्य पैलूंविषयी ठोस निष्कर्ष काढण्यास मदत झाली आहे. मुलाची त्वचा बहुतांश युरोपीय लोकांच्या तुलनेत अधिक काळी आढळून आली. हा शिशू विलाब्रुना नावाच्या लोकांचा पूर्वज होता असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हिमयुगानंतर 14 हजार वर्षांपूर्वी राहणाऱ्या लोकांचा हा समूह होता असे एलेक्झेंड्रा यांनी सांगितले आहे.

आम्ही हिमयुगातील लोकांविषयी अधिकाधिक माहिती प्राप्त करत आहोत. हे अध्ययन या कोड्यात एक मूल्यवान तुकडा जोडणारे असल्याचे मानवशास्त्रज्ञ वैनेसा विलाल्बा-मौको यांनी म्हटले आहे. मुलाचा सांगाडा चांगल्या स्थितीत सापडला होता, याचमुळे वैज्ञानिकांना त्याच्या दातांचे विस्तृत विश्लेषण करता आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article