For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात नऊ वर्षांत 17 हजार 828 जणांना टीबीची बाधा

12:12 PM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात नऊ वर्षांत 17 हजार 828 जणांना टीबीची बाधा
Advertisement

निक्षय पोषण योजना (एनपीवाय) चा गेल्या दोन वर्षांत 2500 पेक्षा अधिक जणांनी घेतला लाभ : गेल्या दोन वर्षांत टीबीचे 336 बळी,नवीन तंत्रज्ञानाद्वारे चाचण्या, अवघ्या दोन तासांत  टीबीचा शोध

Advertisement

पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून टीबी (क्षयरोग) च्या ऊग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत राज्यभरात असे एकूण 17 हजार 828 ऊग्ण आढळलेले आहेत. तसेच क्षयऊग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुऊ करण्यात आलेल्या निक्षय पोषण योजना (एनपीवाय)चा लाभ गेल्या दोन वर्षांत गोव्यातील 2 हजार 500 पेक्षा जास्त क्षयरोग ऊग्णांनी घेतलेला असून, जानेवारी 2022 पासून राज्याला या योजनेंतर्गत 65 लाख ऊपये मिळाल्याची माहिती  नुकत्याच झालेल्या लोकसभेत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2025 पर्यंत संपूर्ण देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. त्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत (एनटीईपी) सर्वच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. क्षयरोगग्रस्त ऊग्णांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मदत पुरविण्यात येत आहे. ज्या भागांमध्ये सर्वाधिक ऊग्ण आढळून येत आहेत, त्या भागांत लक्ष ठेवण्यात येत असून, सरकारी इस्पितळांमध्ये टीबी ऊग्णांवर मोफत उपचार देखील केले जात आहे. सगळे प्रयत्न सरकारतर्फे सुऊ असून वाढत्या संख्येचा आकडा चिंताजनक आहे. तसेच 2020 ते 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 336 क्षयरोगग्रस्त ऊग्णांचा मृत्यू गोव्यात झालेला आहे. दरम्यान, गोव्यात गेल्या नऊ वर्षांत एकूण 17 हजार 828 ऊग्ण सापडलेले आहे. 2015 मध्ये 1599, 2016 मध्ये 1966, 2017 मध्ये 1935, 2018 मध्ये 2492, 2019 मध्ये 2410, 2020 मध्ये 1660, 2021 मध्ये 2018, 2022 मध्ये 2091 तर 2023 नोव्हेंबरपर्यंत 1657 ऊग्ण सापडलेले आहेत.

क्षयरोग म्हणजे...

Advertisement

  • मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लुलोसिस (एमटीबी) बॅक्टेरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवाणुंद्वारे घातक संसर्गजन्य रोग.
  • क्षयरोग हवेद्वारे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिमध्ये पसरतो. फुफ्फुसाच्या क्षयरोगाची लागण झालेले लोक जेव्हा शिंकतात, खोकतात किंवा थुंकतात तेव्हा ते क्षयरोगाचे जिवाणू हवेत सोडतात.
  • क्षयरोगाचे विषाणू फुफ्फुसांवर परिणाम करतात. शिवाय मूत्रपिंड, मेंदू आणि पाठीचा कणा यासारख्या शरीराच्या इतर अवयवांचे देखील नुकसान करतात.

क्षयरोगाची लक्षणे...

  • कमी दर्जाचा ताप वारंवार येणे
  • खोकला, जास्त कफ
  • कफावाटेतून रक्त पडणे
  • अशक्तपणा
  •  वजन कमी होणे
  • भूक न लागणे
  • छातीत दुखणे
  • रात्रीचा घाम येणे

क्षय ऊग्णांना दरमहा 500 ऊ. आर्थिक मदत

निक्षय पोषण योजना 2018 मध्ये क्षयऊग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी सुऊ करण्यात आली होती. या योजनेंतर्गत क्षयऊग्णांना उपचारासाठी दरमहा 500 ऊपये आर्थिक मदत दिले जाते. 2022 मध्ये एकूण 46 लाख ऊपये 1 हजार 740 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे. तर 4 डिसेंबर 2023 पर्यंत 817 लाभार्थ्यांना 19 लाख ऊपये वितरीत करण्यात आले आहे.

चाचण्या झाल्या सोप्या..

टीबीची चाचणी करण्यासाठी अनेक दशके मानवी थुंक घेऊनच प्रारंभिक निदानासाठी चाचणी केली जात होती. परंतु गोवा सरकारच्या आरोग्य खात्याने ही  जुनी पद्धत सोडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रोस्कोपिक पद्धतीने टीबीची तपासणी सुऊ करण्यात आली आहे. तसेच कोविड महामारीनंतर मायक्रोस्कोपिक चाचण्या अवघ्या दोन तासांत टीबीचा शोध घेऊ शकतात. टीबी असलेल्या ऊग्णांसाठी मायक्रोस्कोपिक चाचण्या महत्त्वाची ठरणार असून, या रोगाचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे राज्यात टीबीसाठी 100 टक्के मायक्रोस्कोपिक तांत्रिक चाचणीच करून त्यानुसार उपचार सुऊ करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.